Cheapest Recharge Plans: टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल, व्हीआय आणि बीएसएनएलकडे ग्राहकांसाठी एकापेक्षा एक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपन्यांकडे अगदी 200 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत येणारे रिचार्ज प्लॅन्स आहेत. या कंपन्यांकडून केवळ सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठीही काही प्लॅन्स सादर करण्यात आले आहेत. सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येणाऱ्या अशाच काही स्वस्त प्लॅन्स विषयी जाणून घेऊयात.
जिओचा 189 रुपयांचा प्लॅन
जिओने सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी 189 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. कंपनीच्या 189 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची मुदत 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 300 एसएमएस आणि एकूण 2GB डेटा मिळतो. यासोबतचJioTV, JioCinema (नॉन-प्रिमियम) आणि JioCloud सेवांचा देखील लाभ मिळेल.
एअरटेलचा 199 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या ग्राहकांना सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी 199 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि एकूण 2GB डेटाचा फायदा मिळतो.
व्हीआयचे शानदार प्लॅन्स
व्हीआयकडे सर्कलनुसार ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध आहेत. काही सर्कलमध्ये हा प्लॅन 99 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर काही ठिकाणी 155 रुपये खर्च करावे लागतील. 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 15 दिवसांच्या मुदतीसह 200MB डेटा, 99 रुपये टॉकटाइम मिळेल. तर अतिरिक्त फायद्यांसाठी ग्राहक 155 रुपयांचा रिचार्ज करू शकता. या प्लॅनच्या मदतीने सिम कार्ड सुरू ठेवण्यास मदत होईल.
BSNL चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स
BSNL कडे सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी सर्वात कमी किंमतीत येणारे प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीकडे 7 दिवसांच्या मुदतीसह येणारा 59 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये दररोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. थोडी जास्त मुदत हवी असल्यास 99 रुपयांच्या प्लॅनचा विचार करू शकता. याची वैधता 17 दिवस असून, यात अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. मात्र, यामध्ये कोणतेही अतिरिक्त फायदे उपलब्ध नाहीत.