FASTag: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने (NPCI) FASTag व्यवहारांसाठी नवीन नियम लागू केले जाणार आहेत. टोल नाक्यावर जाताने फास्टॅग खात्यात पैसे नसल्यास खाते ब्लॅकलिस्ट केले जात असे. आता यासाठी काही कालावधी देण्यात आला आहे.
नवीन नियमांनुसार, प्रवाशांना कमी शिल्लक किंवा ब्लॅकलिस्टेड खात्यांसाठी फक्त 70 मिनिटे दिली जातील. यानंतर त्यांचे टोल पेमेंट नाकारले जाऊ शकतो. यामुळे टोल व्यवहार अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.
17 फेब्रुवारीपासून जर टोल प्लाझावर टॅग रीड करण्यापूर्वी 60 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फास्टॅग ब्लॅकलिस्टेड असेल किंवा रीड झाल्यानंतर किमान 10 मिनिटे ब्लॅकलिस्टेड राहिले असेल, तर पेमेंट होणार नाही.
या नवीन नियमामुळे वाहनचालकांना त्यांच्या FASTag ची स्थिती सुधारण्यासाठी 70 मिनिटांची वेळ देतो. आता टोल प्लाझावर शेवटच्या क्षणी FASTag रिचार्ज करणे फायद्याचे ठरणार नाही. जर तुमचा FASTag ब्लॅकलिस्टेड असेल, तर त्वरित रिचार्ज केल्यावरही पेमेंट होणार नाही.
जर तुमचा FASTag ब्लॅकलिस्टेड असेल आणि तुम्ही टोल क्रॉस केला, तर तुमच्याकडून दुप्पट शुल्कआकारले जाईल. मात्र, जर तुम्ही टॅग रीड झाल्यानंतर 10 मिनिटांत रिचार्ज केला, तर तुम्ही पेनल्टी रिफंडसाठी विनंती करू शकता आणि कोणताही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. त्यामुळे, FASTag खात्यात रक्कम कायम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, KYC अपडेट करून घ्यावी, अन्यथा शेवटच्या क्षणी FASTag रिचार्ज करणे शक्य होणार नाही.