संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

दिनविशेष! जगविख्यात नृत्यकलाकार अमला शंकर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जगविख्यात नृत्यकलाकार, अभिनेत्री आणि समाजभान ठेवून काम करणाऱ्या अमला शंकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म २७ जून १९१९ जैसोर बांगला देशात झाला.

अमला शंकर यांचा परिवार सूरूवातीपासून कला क्षेत्राला जोडलेला होता. १९३० मध्ये त्यांची उदय शंकर यांच्या बरोबर ओळख झाली. व त्या उदय शंकर यांच्या ग्रुपमध्ये काम करू लागल्या. त्यांनी आपला पहिला स्टेज शो १९३१ मध्ये बेल्जियम मध्ये केला. १९३९ मध्ये चेन्नई डान्स कार्यक्रम करत असताना उदय शंकर यांनी लग्नाची मागणी घातली. १९४२ मध्ये त्यांनी उदय शंकर यांच्या बरोबर लग्न केले. त्यांची दोन्ही मुले आनंद व ममता संगीत और कला क्षेत्रात काम करत असत. आपले पती उदय शंकर यांच्यासमवेत प्रतिभाशाली नृत्याविष्कार करणाऱ्या अमला शंकर यांनी या भारतीय चित्रपट इतिहासातील मैलाचा दगड ठरलेल्या १९४८ साली आलेल्या ‘कल्पना’ या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती.

बंगालमधील दुष्काळात लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्यांत अमला शंकर होत्या. त्यांना डान्स बरोबर, पेंटिंग, रायटिंग या कलाही अवगत होत्या. त्यांना बंग विभुषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अमला शंकर यांना २०१२ साली संगीत नाट्य अकादमी टागोर पुरस्कार मिळाला होता. अमला शंकर यांचे २४ जुलै २०२० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे

९४२२३०१७३३

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami