CM Siddaramaiah : मुख्यमंत्र्यांचा रागाचा पारा चढला! भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारला, व्हिडिओ व्हायरल

CM Siddaramaiah

Karnataka CM Siddaramaiah Controversy | कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कर्नाटकात आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी रागात थेट पोलीस अदिकाऱ्यावर हात उगारल्याचा उगारल्याचा व्हिडिओ (Viral video) सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

रिपोर्टनुसार, एका कार्यक्रमादरम्यान सिद्धरामय्या भाषण देत असताना काही भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी स्टेजजवळ निदर्शने केली. यामुळे सिद्धरामय्या यांना भाषण करताना अडथळा येत होतो. त्यामुळे चिडलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट पोलिसांना बोलवून जाब विचारला व रागाच्या भरात हात उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र ते लगेच थांबले.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) नारायण भारमनी यांच्यावर स्टेजभोवती सुरक्षा राखण्याची जबाबदारी होती. पण गोंधळ थांबवण्यात उशीर झाल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या चिडले आणि त्यांनी भारमनी यांना स्टेजवर बोलावले. तेथे सर्वांसमोर “तुम्ही कोण आहात, काय करत होता?” असे विचारून रागाच्या भरात हात उचलण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

या प्रकारामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. जनता दल (सेक्युलर) (JDS) ने ‘X’ (ट्विटरवर) सिद्धरामय्या यांच्या वागणुकीचा निषेध केला आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा अहंकार दाखविल्याचा आरोप करत, “सरकारी अधिकाऱ्यांवर हात उचलणे अक्षम्य आहे,” असे म्हटले आहे.

JDS ने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, “मुख्यमंत्री 5 वर्षांसाठी असतात, पण सरकारी अधिकारी अनेक वर्षे जनतेची सेवा करतात. सत्ता कायमस्वरूपी नसते.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला (Pahalgam terror attack) याबाबतही वक्तव्य केले होते. त्यांनी “युद्धाची गरज नाही” असे मत मांडले होते, ज्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. नंतर त्यांनी स्पष्टीकरण देत युद्ध हा शेवटचा पर्याय असावा, शांतता आणि अंतर्गत सुरक्षा मजबूत करावी, असे स्पष्ट केले होते.