Ather Energy IPO : पैसे तयार ठेवा! लवकरच येणार लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीचा IPO, पाहा माहिती

Ather Energy IPO

Ather Energy IPO | टायगर ग्लोबलने (Tiger Global) गुंतवणूक केलेली इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी एथर एनर्जी (Ather Energy IPO) लवकरच शेअर बाजारात आपला IPO आणतेय. आयपीओच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आता कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार आहे.

या IPO मध्ये एक शेअर खरेदी करण्यासाठी किंमत 304 ते 321 रुपयांदरम्यान असेल. 28 एप्रिलपासून आयपीओसाठी बोली लावता येईल. तर बोली लावण्याचा शेवटचा दिवस 30 एप्रिल असेल.

जो कोणी IPO मध्ये पैसे गुंतवणार आहे, त्याला एकावेळी किमान 46 शेअर्स घ्यावे लागतील. त्यानंतर 46 च्या पटीत शेअर्स खरेदी करता येतील.

एथर एनर्जी IPO मध्ये 75% भाग मोठ्या गुंतवणूकदारांसाठी (QIB), 15% मोठ्या वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि 10% सामान्य लोकांसाठी (Retail Investors) ठेवलेला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअरवर 30 रुपयांची सूट दिली जाईल.

शेअर्स वाटप 2 मे रोजी होईल. ज्यांना शेअर्स मिळतील, त्यांना 5 मे रोजी पैसे परत मिळतील किंवा शेअर्स थेट डिमॅट खात्यात जमा होतील. शेअर्स 6 मे रोजी शेअर बाजारात – BSE आणि NSE लिस्ट होतील.

एथर एनर्जी काय करते?

ही कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर्स (Electric Two-Wheeler India) तयार करते. स्कूटरसोबतच चार्जर, ॲप्स आणि अ‍ॅक्सेसरीज सुद्धा तयार करते. Rizta नावाची त्यांची फॅमिली स्कूटर गेल्यावर्षी खूप लोकप्रिय झाली आणि त्यामुळे कंपनीचा तोटा कमी झाला – मागील वर्षी 776 कोटी रुपये तोटा होता, यावर्षी तो 578 कोटी रुपये झाला.

IPO मधून मिळणारा पैसा कुठे वापरणार?

कंपनी IPO मधून सुमारे 2,626 कोटी रुपये उभारणार आहे. त्यातील 927.2 कोटी रुपये महाराष्ट्रात नवीन स्कूटर प्लांटसाठी, 750 कोटी रुपये संशोधन व विकासासाठी (R&D), 300 कोटी रुपये जाहिरातीसाठी, आणि 40 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील. या IPO मध्ये काही शेअर्स कंपनीचे जुने भागधारक आणि संस्थापक विकणार आहेत.