प्रयागराज -सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभ मेळ्यात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. आज सेक्टर ८ मधील ४ तंबूना आग लागली.या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. केवळ ४ रिकामे तंबू जळाले. आज दुपारी ३ वाजता ही आग लागली. मात्र अग्निशमन दलाने ताबडतोब आग विझवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सर्वात प्रथम १९ जानेवारीला गीता प्रेसला आग लागली होती.या आगीत प्रचंड नुकसान झाले होते त्यानंतर ३० जानेवारीला सेक्टर २२ मध्ये आग लागून १५ तंबू जळाले. ७ फेब्रुवारीला सेक्टर १८ मध्ये आग लागून २२ तंबू जळाले. १५ फेब्रुवारीला सेक्टर १८ -१९ मध्ये आग लागून २ तंबू आणि पैशाच्या २ बॅगा जळाल्या होत्या.
कुंभमेळ्यात पाचव्यांदा आग! ४ तंबू जळाले
