नवी दिल्ली – भारताची स्मार्टफोन निर्यात एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत दीड लाख कोटीवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह योजनेच्या माध्यमातून स्मार्टफोनच्या निर्यातीत ही विक्रमी वाढ झाली आहे. ही वाढ १४० टक्के एवढी आहे.त्याआधीच्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ९९ हजार १२० कोटी रुपयांची स्मार्टफोन निर्यात झाली होती. त्यापैकी सुमारे ७० टक्के वाटा फॉक्सकॉन आणि अॅपल आयफोन विक्रेत्यांचा राहिला आहे.मागील आर्थिक वर्षात याच कालावधीच्या तुलनेत फॉक्सकॉच्या निर्यातीत ४३ टक्के वाढ झाली आहे. आयफोनच्या निर्यातीत टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा वाटा २२ टक्के आहे. १२ टक्के वाटा तामिळनाडूच्या पेगाट्रॉन कंपनीचा तर २० टक्के वाटा सॅमसंगचा आहे.
भारताची स्मार्टफोन निर्यात दीड लाख कोटी रुपयांवर
