तिरुअनंतपुरम – केरळमध्ये मागील काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत असून केरळ सरकारने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी फेसबूकवर पोस्ट करून लोकांना उष्माघात, त्वचा करपणे आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे यांसारख्या आजारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.केरळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानेही राज्याच्या काही भागांत तापमानात दोन ते तीन अंश सेल्सियस एवढी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना काळजी घेण्याचा सल्ला विजयन यांनी दिला आहे.
केरळमध्ये उष्णतेची लाट सरकारचा सतर्कतेचा इशारा
