मार्सेलीस – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या मार्सेलीस शहरात आज भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले.त्यानंतर मोदी आणि मॅक्रॉन यांनी आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक अणुभट्टी प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्या तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्याचा आज शेवटचा दिवस होता.१० फेब्रुवारी मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरुन नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये पोहोचले. त्यावेळी येथे वास्तवास असलेल्या भारतीय लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले होते. आज नरेंद्र मोदी मार्सेलीस शहरात दाखल झाले. दोन्ही नेत्यांनी ऐतिहासिक मॅझारग्यूस स्मशानभूमीला भेट देऊन पहिल्या नरेंद्र मोदी यांनी महायुद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. वाणिज्य दूतावासाचे लोकार्पण सोहळ्यासाठी भारतीय लोकांनी भारतीय झेंडे घेऊन मोठी गर्दी केली. मोदी आणि मॅक्रॉन यांनी दूतावासाचे लोकार्पण केल्यानंतर त्यांनी लोकांना हात दाखवत त्यांचे अभिवादन स्वीकारले. मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करण्यास मार्सेलीस शहरातील लोकांनी मदत करण्याची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यानंतर ते अमेरिकेसाठी रवाना झाले.
मोदी, मॅक्रॉन यांनी मार्सेलीसमध्ये वाणिज्य दूतावासाचे लोकार्पण केले
