‘मोदींच्या मते जर…’, ‘फुले’ चित्रपटावरील सेन्सॉरशिपवरून अनुराग कश्यपचा संताप, जातीव्यवस्थेबद्दल म्हणाला…

Anurag Kashyap on Phule Movie Controversy

Anurag Kashyap on Phule Movie Controversy | थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ चित्रपट (Phule Movie) सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) आणि पत्रलेखा (Patralekhaa) यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटावर जातीयवाद पसरवल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन11 एप्रिलऐवजी 25 एप्रिल 2025 रोजी होणार आहे.

‘फुले’ चित्रपटावर काही संघटनांनी जातीयवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशभरात (Maharashtra) या चित्रपटाला विरोध वाढला आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (Central Board of Film Certification – CBFC) चित्रपटात अनेक बदल करण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे चित्रपटाच्या मूळ कथानकावर परिणाम झाला आहे.

सेन्सॉर बोर्डाने (CBFC) चित्रपटाला ‘यू’ प्रमाणपत्र (U Certificate) दिले असले, तरी त्यात अनेक बदल करण्यास सांगितले. ‘महार’, ‘मांग’, ‘पेशवाई’ (Peshwai) आणि ‘मनुची जातिव्यवस्था’ यासारखे संदर्भ काढून टाकण्यात आले. तसेच, ‘तीन हजार वर्षे जुनी गुलामगिरी’ हा संवाद ‘अनेक वर्षे जुनी गुलामगिरी’ असा बदलण्यात आला. या बदलांमुळे चित्रपटाच्या ऐतिहासिक संदर्भांवरप्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा संताप

    चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याने सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, “पंजाब 95, तीस, धडक 2, फुले – किती चित्रपट अडकले आहेत, हे दर्शवते की सरकार जातीयवादी आणि प्रादेशिकवादी आहे. त्यांना स्वतःचा चेहरा आरशात पाहण्याची लाज वाटते.” त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले, “चित्रपट सेन्सॉरसाठी जातो तेव्हा फक्त चार सदस्य असतात. मग बाहेरील गटांना चित्रपट कसा पाहायला मिळतो?”

    अनुराग कश्यपने पुढे लिहिले की, ‘धडक 2’ च्या प्रदर्शनाच्या वेळी सेन्सॉर बोर्ड म्हणाले होते की, मोदीजींनी भारतातून जातीयवाद संपवला आहे. त्यामुळे संतोष देखील भारतात प्रदर्शित झाला नाही. आता ब्राह्मणाला फुलेंशी समस्या आहे.

    जेव्हा जातीयवादच नाही तर तो कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहे? तू कोण आहेस? तू रागाने का जळत आहेस? जेव्हा जातीयवाद नव्हता तेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई का होते? एकतर तुमचा ब्राह्मण समुदाय इथे नाहीये, कारण मोदींच्या मते भारतात जातीयवाद नाहीये. किंवा सगळे मिळून सर्वांना मूर्ख बनवत आहेत. एकत्र निर्णय घ्या. भारतात जातीयवाद आहे की नाही? लोक मूर्ख नाहीत, असे तो म्हणाला.

    दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनीही सोशल मीडियावर सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले, “समाजात जातिव्यवस्था नाही का? ती कधीच नव्हती का? आपण स्वतःशी खोटे का बोलावे? आणि फक्त चित्रपटानेच खोटे का बोलावे? निवडणूक आयोग भाषणांमध्ये जे परवानगी देतो आणि सेन्सॉर बोर्ड चित्रपटात जे परवानगी देतो, यांचे निकष वेगळे कसे असू शकतात?”

    दरम्यान,दिग्दर्शक अनंत महादेवन (Ananth Mahadevan) यांनी फुले चित्रपट आता 25 एप्रिलला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.