आणखी एक देश भूकंपाने हादरला, दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले सौम्य धक्के

Afghanistan Earthquake

Afghanistan Earthquake | अफगाणिस्तान (Afghanistan Earthquake) आणि फिलीपिन्समध्ये (Philippines Earthquake) आज मोठ्या भूकंपांचे धक्के नोंदवले गेले. युरोपियन-मेडिटरेनियन सीस्मोलॉजिकल सेंटरने (EMSC) दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता सुरुवातीला 6.4 मॅग्निट्यूट नोंदवण्यात आली होती, मात्र नंतर ती सुधारून 5.6 मॅग्निट्यूट करण्यात आली.

या भूकंपाचे परिणाम इतके तीव्र होते की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वरील काही युजर्सनी दिल्ली-एनसीआर (Delhi NCR Tremors) मध्येही कंपन जाणवल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात (Kishtwar Earthquake) 2.4 magnitude चा सौम्य भूकंप झाला. हा भूकंप भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST) सकाळी 5:14 वाजता झाला असून, त्याचा केंद्रबिंदू अक्षांश 33.18 उत्तर व रेखांश 75.89 पूर्व येथे होता. भूकंपाची खोली 5 किमी इतकी होती.

अफगाणिस्तानचा असुरक्षित भूभाग

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समन्वय कार्यालयाच्या (UNOCHA) अहवालानुसार, अफगाणिस्तान हा भूगर्भीयदृष्ट्या अत्यंत असुरक्षित देश आहे. इथे वारंवार पूर, भूस्खलन आणि भूकंप होतात. दशकांपासून सुरू असलेल्या संघर्ष, विकासाचा अभाव आणि मूलभूत सुविधा नसल्यामुळे अफगाणिस्तानातील (Afghanistan Natural Disaster) अनेक समुदाय अशा संकटांशी लढण्याच्या स्थितीत नाहीत.

रेड क्रॉसच्या माहितीनुसार, हिंदू कुश पर्वतरांगांमध्ये (Hindu Kush Fault Lines) दरवर्षी भूकंप होतात. या पर्वतरांगांमध्ये अनेक सक्रिय फॉल्ट लाइन्स असून, हेरात शहरातून थेट एक प्रमुख फॉल्ट लाईन जाते. अफगाणिस्तान भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या (Indian Eurasian Tectonic Plates) दरम्यान वसलेला असल्यामुळे इथल्या जमिनी सतत हलत राहतात.

दक्षिण फिलीपिन्सलाही भूकंपाचा धक्का

अफगाणिस्तानातील भूकंपानंतर काही तासांतच फिलीपिन्समध्येही (Southern Philippines Earthquake) 5.6 मॅग्निट्यूटचा भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या माहितीनुसार, मिंडानाओ बेटाच्या (Mindanao Island) किनाऱ्याजवळ हा भूकंप झाला असून, त्याची खोली 30 किमी इतकी होती.

फिलीपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सीस्मोलॉजीच्या (PHIVOLCS) माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्रबिंदू मैतुम शहराच्या नैऋत्येस सुमारे 43 किमी अंतरावर होते. ही जागा डोंगराळ असून लोकवस्ती कमी आहे.

मैतुममधील अग्निशमन अधिकारी गिल्बर्ट रोलिफोर यांनी AFPला सांगितले की, “भूकंपाचा धक्का जोरात होता पण फार काळ टिकला नाही. सध्या कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आलेले नाही.”