मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त तेजी पहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १६९५ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर वाजाराचा निर्देशांक निफ्टी ५४० अंकांनी उसळला. बँक निफ्टी १२९७ अंकांच्या वाढीसह उघडला.
निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास निफ्टी मेटल आणि निफ्टी रिअल्टीदेखील एक टक्क्यापेक्षा जास्त तेजीसह व्यवहार करत होते.आज जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये खरेदी दिसून आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील ७० देशांवर लादलेल्या आयात शुल्काला ९० दिवसांची स्थिगिती दिल्याचे सकारात्मक पडसाद आजही बाजारात दिसून आले. गिफ्ट निफ्टी ४०० अंकांनी वधारून २३,३०० अंकांवर पोहोचला.
