मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९२ अंकांच्या घसरणीसह २३,६०३ अंकांवर तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २१३ अंकानी घसरून ७८,१०० अंकांवर बंद झाला.बँक निफ्टीमध्ये मात्र आज ३९ अंकांची किरकोळ वाढ झाली.आजच्या व्यवहारांत औषधनिर्मिती, माहिती तंत्रज्ञान आणि खासगी बँक वगळता अन्य सर्व निर्देशकांमध्ये घसरण झाली. वाहन निर्मिती, ग्राहकोपयोगी वस्तु आणि बांधकाम क्षेत्रात १ ते २ टक्क्यांची घसरण झाली.धातू, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, उर्जा आणि तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात ०.४ ते ०.८ टक्के घसरण झाली.निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक १.२ टक्क्याने तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.३ टक्कयाने घसरला. निफ्टीमध्ये ट्रेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारती एअरटेल, टायटन, एटीपीसी या शेअरमध्ये मोठी घसरण झाली.
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण
