TCS Salary Hike 2025 | देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने चालू वर्षातील पगारवाढ (TCS Salary Hike 2025) तात्पुरती स्थगित केल्याची माहिती दिली असून, ही वाढ व्यवसायिक स्थितीवर अवलंबून असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
TCS चे मुख्य मनुष्यबळ अधिकारी मिलिंद लक्कड यांनी मुंबईत आयोजित चौथ्या तिमाहीच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “सध्याच्या अनिश्चित वातावरणामुळे वेतनवाढीचा निर्णय वर्षभरात कधीही घेतला जाऊ शकतो. त्यासाठी कोणतेही निश्चित वेळापत्रक ठरवलेले नाही.” लक्कड यांनी वेतनवाढीच्या टक्केवारीविषयी बोलण्याचे टाळले.
TCS ने FY25 मध्ये कॅम्पस प्लेसमेंटमधून (IT Job Market India) 42,000 प्रशिक्षणार्थींना नियुक्त केल्याचे सांगितले. येत्या आर्थिक वर्षात फ्रेशर भरती मागील वर्षाइतकी किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील लक्कड यांनी दिली.
कर्मचारी वाढ आणि ॲट्रिशनचा आलेख
FY25 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी–मार्च 2025) कंपनीने 625 नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली. यानंतर मार्चअखेरीस कंपनीतील एकूण कर्मचारी संख्या 6,07,979 वर पोहोचली, जी डिसेंबरअखेरीस 6,07,354 होती. वर्षभरात एकूण 6,433 कर्मचाऱ्यांची वाढ झाली आहे.
कंपनीचा ॲट्रिशन दर तिसऱ्या तिमाहीतील 13% वरून चौथ्या तिमाहीत 13.3% झाला आहे. मात्र लक्कड यांनी स्पष्ट केले की, “TTM (Trailing Twelve Months) आधारावर ॲट्रिशन दरात 130 बेसिस पॉइंट्सची घट झाली असून, ही बाब आमच्यासाठी सकारात्मक आहे.”
या तिमाहीत TCS चा एकत्रित महसूल 5.3% ने वाढून 64,479 कोटी रुपयांवर गेला असला, तरी निव्वळ नफा 1.69% ने घटून 12,224 कोटी रुपयांवर घसरला आहे. कंपनीच्या सर्वात मोठ्या बाजारपेठ असलेल्या उत्तर अमेरिका विभागात सुरू असलेल्या मागणीतील घ यामुळे महसुलावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याचेही स्पष्ट झाले.