Home Loan Interest Rate | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2025-26 च्या पहिल्या पतधोरण बैठकीत रेपो दरात (repo rate) 0.25% नी कपात करत तो 6% वर आणला आहे. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही घोषणा झाली.
या निर्णयामुळे गृहकर्जदारांना (home loan borrowers) दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या व्याजदरांच्या तुलनेत, आता दर (home loan interest rate) 8% पेक्षा खाली येण्याची शक्यता आहे .
RBI च्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य कर्जदारांना होणार असला तरी, पूर्वी बँकांनी अशा कपातीचा थेट लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवायला टाळाटाळ केली होती. आता मोठ्या बँका — जसे की HDFC Bank आणि Axis Bank — RBI च्या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काही बँकांनी यापूर्वीच विद्यमान ग्राहकांना 25 बेसिस पॉइंट्सचा लाभ दिला आहे.
RBI च्या नियमानुसार, बँकांना दर तीन महिन्यांनी किमान एकदा व्याजदरांचा आढावा घ्यावा लागतो. त्यामुळे नवीन कर्जदारांना (new home buyers) लवकरच कमी दराचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांचे कर्ज रेपो दराशी संलग्न आहे, त्यांना स्वयंचलित पद्धतीने कपात मिळू शकते.
EMI किती कमी होईल?
उदाहरणार्थ, एखाद्याने 20 वर्षांसाठी 9% व्याजदराने 50 लाखांचे कर्ज (home loan EMI savings) घेतले असल्यास, सध्याचा EMI सुमारे रुपये 44,986 इतका येतो. जर बँकांनी व्याजदरात 0.50% नी कपात केली, तर हा EMI सुमारे रुपये 43,391 इतका होईल, म्हणजेच दरमहा रुपये 1,595 आणि वर्षाकाठी रुपये 19,140 ची बचत होऊ शकते. .
जुने आणि नवीन कर्ज: फायदा कोणाला?
2019 पासून मंजूर होणारी सर्व किरकोळ फ्लोटिंग-रेट कर्जे ही RBI च्या बाह्य बेंचमार्क दरांशी संलग्न असतात. यामध्ये प्रामुख्याने रेपो दर हा बेंचमार्क असतो. कर्जाचा अंतिम व्याजदर ठरतो तो तीन गोष्टींवर — रेपो दर (repo rate), बँकेचा स्प्रेड (b आणि कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर (credit score) या तीन घटकांवर (loan pricing factors).
रेपो रेट कमी झाल्याने अनेक कर्जदारांचे दर 8% पेक्षा कमी येतील. उत्तम क्रेडिट स्कोअर (750 पेक्षा जास्त) असलेल्यांना अधिक लाभ मिळेल.
कर्जदारांनी आता काय करावे?
RBI च्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा त्या ग्राहकांना मिळणार आहे ज्यांचे कर्ज रेपो दराशी संलग्न आहे आणि ज्यांनी यापूर्वी जास्त दराने कर्ज घेतले आहे. नव्याने गृहखरेदी करणाऱ्यांसाठी (property buyers) देखील हा चांगला काळ असून, व्याजदर कमी झाल्याने त्यांचा EMI अधिक परवडणारा ठरेल.