PM Internship Scheme 2025 | केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Corporate Affairs) ‘PM Internship Scheme 2025’ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2025 पर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत लवकर संपणार होती, परंतु अधिक उमेदवारांना संधी मिळावी म्हणून सरकारने मुदतवाढ जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार pminternship.mca.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
नोंदणी कशी कराल?
या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी पुढील टप्प्यांचे पालन करणे आवश्यक आहे:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या – pminternship.mca.gov.in
- ‘Register’ लिंकवर क्लिक करा
- आवश्यक माहिती भरून सबमिट करा
- पोर्टलवर तुमच्या माहितीच्या आधारे एक रेझ्युमे ऑटो-जनरेट केला जाईल
- स्थान, क्षेत्र, कार्य भूमिका आणि पात्रतेनुसार 5 इंटर्नशिपपर्यंत निवड करा
- अर्ज साठवून ठेवा आणि पाठवा
पात्रता निकष काय आहेत?
- 10वी / 12वी / ITI / डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण
- नुकतेच पदवीधर झालेले उमेदवार (गैर-अग्रगण्य संस्थांतून)
- ITI – मॅट्रिक्युलेशन + संबंधित ट्रेडमध्ये ITI
- डिप्लोमा – इंटरमिजिएट + AICTE मान्य डिप्लोमा
- पदवी – UGC/AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातील बॅचलर डिग्री
- वयमर्यादा – 18 ते 24 वर्षे, (OBC/SC/ST उमेदवारांना सवलत)
उमेदवारांना काय फायदे मिळणार?
- दरमहा रुपये 5,000 स्टायपेंड
- एकवेळची रुपये 6,000 प्रोत्साहन रक्कम
- 12 महिन्यांची प्रत्यक्ष इंटर्नशिप – टॉप 500 कंपन्यांमध्ये
- प्रत्यक्ष उद्योग-प्रशिक्षणाचा अनुभव
- कमी उत्पन्न गटातील तरुणांना प्राधान्य
ही योजना नेमकी आहे तरी काय?
सरकारने स्पष्ट केलं आहे की ही योजना कुशल, प्रशिक्षित आणि उद्योगसज्ज मनुष्यबळ तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. सैद्धांतिक शिक्षण आणि प्रत्यक्ष कामानुभव यामधील दरी भरून काढण्याचे उद्दिष्ट्य या योजनेत आहे. यामध्ये तरुणांना खऱ्या उद्योग क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
सरकारने या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात 1.25 लाख तरुणांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवलं असून, पुढील 5 वर्षांत 1 कोटी युवकांना इंटर्नशिपची संधी देण्याचा मानस आहे. देशातील तरुणांसाठी ही योजना म्हणजे उद्योग-जगतातील प्रवेशद्वार ठरू शकते. केवळ शैक्षणिक पात्रता असून उपयोग नाही, प्रत्यक्ष अनुभवाची जोड हवी – हे योजनेचं तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांनी 15 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करण्याचं विसरू नये.