Ram Navami 2025 Date | राम नवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे जो देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. हा दिवस भगवान श्रीराम यांच्या जन्माच्या स्मरणार्थ ‘राम जन्मोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. यंदा राम नवमी (Ram Navami 2025) रविवार, 6 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाणार आहे.
राम नवमी तिथी आणि शुभ मुहूर्त (Ram Navami 2025 Shubha Muhurat)
- चैत्र शुक्ल नवमी तिथी सुरू: 5 एप्रिल 2025, शनिवार, सायं 7:26 पासून
- चैत्र शुक्ल नवमी तिथी समाप्त: 6 एप्रिल 2025, रविवार, सायं 7:22 पर्यंत
- राम नवमी मुख्य तिथी: 6 एप्रिल 2025
- पूजा मुहूर्त: सकाळी 11:08 ते दुपारी 1:39 (एकूण कालावधी – 2 तास 31 मिनिटे)
यंदाच्या राम नवमीला शुभ योग
यंदा राम नवमीच्या दिवशी अनेक शुभ आणि फलदायी योग तयार होत आहेत, जे राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी अतिशय शुभ मानले जातात.
- सुकर्मा योग: 6 एप्रिल, सकाळपासून संध्याकाळी 6:55 पर्यंत
- रवि पुष्य योग: 6 एप्रिल, सकाळी 6:18 ते 7 एप्रिल, सकाळी 6:17 पर्यंत
- सर्वार्थ सिद्धी योग: 6 एप्रिल, सकाळी 6:18 पासून दिवसभर
राम नवमीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
राम नवमी केवळ एक सण नसून, तो सत्य, धर्म, मर्यादा आणि न्यायाचे प्रतीक आहे. भगवान श्रीराम यांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणून ओळखले जाते, कारण त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी सत्य आणि कर्तव्य यांचा आग्रह धरला. या दिवशी उपवास करून रामकथेचे श्रवण केल्याने मानसिक शांती लाभते आणि नकारात्मकतेपासून मुक्ती मिळते.
अयोध्येत चैत्र शुक्ल नवमीला श्रीरामांचा जन्म झाला. हा सण चांगल्याच्या वाईटावर विजयाचे प्रतीक मानला जातो.या दिवशी अन्न, वस्त्र किंवा गरजूंना मदत केल्याने पुण्य प्राप्त होते. घरात विशेष पूजा करून सुख, शांतता आणि समृद्धी नांदते.
घरी राम नवमी पूजा कशी करावी?
तुम्ही मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊ शकता. मंदिरात जाणे शक्य नसेल, तर घरीही राम नवमीची पूजा करता येते. घरी पूजा कशी करू शकता हे जाणून घेऊयात.
- लाकडी पाटावर लाल वस्त्र अंथरावे.
- भगवान श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची मूर्ती किंवा चित्र गंगाजलाने शुद्ध करून स्थापन करावे.
- त्यानंतर चंदन, अक्षता, फुले अर्पण करावीत.
- तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालीसा आणि रामायण पठण करावे.
- इच्छेनुसार सुंदरकांड किंवा हनुमान चालीसाचे पठणही करता येते.