पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंढरपुरात भक्तनिवास उभारले आहे. या भक्तनिवासातील खोल्या नोंदणी करण्यासाठी आता ऑनलाइन संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर भाविकांना ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
या भक्त निवासातील खोल्यांच्या ऑनलाईन सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व संगणक प्रणाली टिसीएस कंपनी सेवाभावी तत्वावर मोफत उपलब्ध करून करून देणार आहे. आता भाविकांना https://online.vitthalrukminimandir.org.in/#/logi 11 या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून खोली नोंदणी करता येणार आहे.