इस्लामाबाद – तालिबानी महिलांना माणूस समजत नाहीत . महिलांवर अन्याय अत्याचार करतात त्यामुळे अफगाणिस्तानातील महिलांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे जगातील सर्व देशांनी तालिबानला मान्यता देऊ नये . तालिबान्यांविरुद्ध आवाज उठवावा असे नोबेल पुरस्कार विजेत्या पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्त्या मालाला युसूफ़जाई यांनी जगातील सर्व राष्ट्रांनाआवाहन केले आहे.
रविवारी इस्लामाबाद येथे मुलींच्या शिक्षणावर आयोजित एका परिषदेत बोलताना मलालाने अफगाणिस्तानातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा पाढाच वाचला. त्या म्हणाल्या जगात आज महिला सर्वच क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहेत. कारण महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे शिक्षण घेऊन महिलांनी स्वतःची त्यांच्या देशाची प्रगती केली . पण तालिबानी शासन कर्त्यांनी महिलांना खिडकीतून बाहेर बघण्यावरही निर्बंध घातले आहेत. हा एक प्रकारचा तुरुंगवास आहे. म्हणूनच अशा क्रूर शासनकर्त्यांना जगणे मान्यता देऊ नये असे मलालाने सांगितले.