मुंबई- काळवीट प्रकरणी सिनेअभिनेता सलमान खान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे. १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी बंदुकीच्या ४ फेरी झाडल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे मित्र होते. त्यावरूच त्यांची हत्या करण्यात आल्याचाही संशय आहे. त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण खान कुटुंबाचा धोका वाढला होता त्यामुळे सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता ही सुरक्षा आणखी मजबूत करण्यात आली आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत आणि घराच्या खिडक्यांना बुलेट प्रूफ काच लावण्यात आल्या आहे. याशिवाय आणखी काही अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे बसवली असून घराबाहेर पोलिसांसोबत खासगी सुरक्षारक्षकदेखील तैनात करण्यात आले आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |