नवी दिल्लीइंडियन एअरलान्सच्या अपहरण करून कंदहारला नेलेल्या विमानाचे पायलट कॅप्टन देवी शरण हे चाळीस वर्षांच्या आपल्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहे. जैश-ए-महम्मद या अतिरेकी संघटनेने इंडियन एअरइन्सच्या विमानाचे १२ डिसेंबर १९९९ रोजी अपहरण केले होते. ते विमान अनेक दिवस कंदहार विमानतळावर उभे करून प्रवाशांना ओलिस ठेवण्यात आले होते. या काळात कॅप्टन देवी शरण हे या विमानाचे मुख्य पायलट होते. त्यांनीच हे विमान जानेवारी २००० मध्ये पुन्हा भारतात आणले होते.
सेवानिवृतीच्या दिवशी ४ जानेवारीला त्यांनी मेलबर्न ते दिल्ली दरम्यानच्या ड्रिमलायनर या विमानाचे परिचालन केले. विमानातच त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम झाला. यावेळी ते म्हणाले की, विमान अपहरणाच्या घटनेने मला हे शिकवले की जीवन हे अनिश्चित आहे. प्रत्येकाने संघर्षासाठी सदैव तयार राहिले पाहिजे. तो माझ्या जीवनातील सर्वात कठीण काळ होता. विमानातील सर्वांचा जीव वाचवणे, हे एकच ध्येय माझ्या समोर होते. मी देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, अशी वेळ कोणत्याही कर्मचारी किंवा प्रवाशावर येऊ नये. सेवानिवृत्तीनंतर आपले मूळ गाव कर्नाल इथे शेती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.