ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट ऑफर दिला जात आहे. या सेलमध्ये तुम्ही iPhone 15 आणि iPhone 14 ला डिस्काउंटसह खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये फोनमध्ये 40 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. आयफोन्सवरील या ऑफर्सविषयी जाणून घेऊयात.
iPhone 15 ची किंमत आणि ऑफर्स
कंपनीने iPhone 15 चे 256GB व्हेरिएंट 89,600 रुपये किंमतीत लाँच केले होते. सध्या हे मॉडेल Amazon वर 24 टक्के डिस्काउंटसह फक्त 68,499 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच, या फोनच्या खरेदीवर तुम्ही 21 हजार रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकता.
फोन खरेदी करताना एसबीआय कार्डवर 1 हजार रुपये डिस्काउंट मिळते. तसेच, जुन्या फोनच्या एक्सचेंजवर 22,800 रुपयांपर्यंतची बचत होईल. अशाप्रकारे, सर्व ऑफर्सचा लाभ मिळाल्यास iPhone 15 ला 45 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
iPhone 14 ची किंमत आणि ऑफर्स
फ्लिपकार्टने iPhone 14 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 59,900 रुपये होती. मात्र, आता सेलमध्ये 14% मोठ्या डिस्काउंटसह फक्त 50,999 रुपयात उपलब्ध आहे. फोन खरेदी करताना एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर केल्यास 1 हजार रुपये अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय, 30,200 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनवर अवलंबून आहे. या सर्व सर्व ऑफर्सचा लाभ मिळाल्यास iPhone 14 ला निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता.