मुंबई – विमान प्रवास सुरु झाल्याबरोबर मोबाईल फोन बंद करण्याच्या किंवा तो फ्लाईट मोडवर टाकण्याच्या सूचना दिल्या जातात. यापुढे मात्र विमान प्रवास सुरु असताना इंटरनेट सेवा वापरायला मिळणार असून देशांतर्गत उडणाऱ्या काही निवडक विमानांमध्ये वायफाय सुविधा देण्यात येणार असल्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे.वायफाय सुविधेमुळे प्रवासी आपला स्मार्ट फोन किंवा लॅपटॉप वापरु शकणार आहेत. सध्या एअर इंडियाने आपल्या एअरबस ए ३५० व बोईंग ७८९ या विमानांमध्ये ही वायफाय सेवा देणार असल्याचे घोषित केले आहे. विमान १० हजार फूट उंचीवर गेल्यावर हे कनेक्शन उपलब्ध होईल. याचे शुल्क न आकारण्याचाही निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. या आधी विनामूल्य वायफायची सुविधा न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस आणि सिंगापूरला जाणाऱ्या विमानांमध्ये देण्यात आली होती. ती आता देशांतर्गत काही निवडक विमानांमध्ये मिळणार आहे. सध्या चाचणीस्तरावर हा उपक्रम राबवला जाणार असून त्या नंतर टप्याटप्याने इतर विमानांमध्येही ही सुविधा देण्यात येणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |