11 जानेवारीला का साजरा करण्यात आला रामलल्लाच्या प्राण प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन? वाचा

Ram Mandir First Anniversary: 22 जानेवारी 2024 ला अयोध्येच्या भव्य राम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भगवान रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली होती. या दिवसापासून मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आले होते. तेव्हापासून जगभरातील लाखो भाविकांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराला भेट दिली जाईल.

प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला जवळपास 1 वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र, यंदा 22 जानेवारीऐवजी 11 जानेवारी 2025 लाच प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 22 जानेवारीऐवजी 11 जानेवारीला या सोहळ्याचा वर्धापन दिन का साजरा करण्यात आला, याविषयी जाणून घेऊया.

तिथीनुसार प्राण प्रतिष्ठापणेला 1 वर्ष पूर्ण

पंचांगनुसार, भगवान रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा (Ram Mandir First Anniversary) 22 जानेवारीला पौष शुक्ल द्वादशीला करण्यात आली होती. तिथीनुसार, हा दिवस यावर्षी 11 जानेवारीला येतो. भारतीय परंपरेत कोणताही महत्त्वाचा दिवस व सण हा चंद्रावर आधारित हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे यंदा 22 जानेवारीऐवजी 11 जानेवारीला प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

राममंदिराच्या (Ram Mandir)  पहिल्या वर्धापनदिनानिमित्त 3 दिवस मंदिराच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 11 जानेवारीपासून ते 13 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 3 दिवस धार्मिक विधी, प्रार्थना आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

दरम्यान, मागील 8 महिन्यांमध्ये तब्बल 2.5 कोटी भाविकांनी प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला भेट दिली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 10 लाख भाविक अयोध्येत आले होते.