बीजिंग – चीन पाकिस्तानला ४० हायटेक फायटर जेट देणार आहे. . बीजिंग आणि इस्लामाबादमध्ये या बद्दल चर्चा सुरु आहे. ही डील फायनल झाली, तर पाकिस्ताकडे चिनी बनावटीच्या जे-३५ ए मल्टी-रोल फायटर जेटच स्क्वाड्रन असेल. जे- ३५ ए ताफ्यात असलेला पाकिस्तान जगातील पहिला आणि एकमेव देश असेल. जे-३५ ए स्टेल्थ फायटर जेट आहे. अमेरिकेनंतर चीनकडेच पाचव्या पिढीची स्टेलथ फायटर विमानं आहेत. पाकिस्तानकडे अमेरिकेने दिलेली एफ-१६ आणि फ्रान्सची मिराज फायटर विमानं आहेत. पाकिस्तान आता ही विमानं बदलण्याचा विचार करत आहे. हाँगकाँग स्थित चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्ट्नुसार चीन दोन वर्षांपेक्षा पण कमी वेळात पाकिस्तानला ४० फायटर जेट देणार आहे.रिपोर्ट्नुसार पाकिस्तानी एअर फोर्सने आधीच ही विमान विकत घ्यायला मंजुरी दिली आहे. बीजिंग अजून पृष्टी केलेली नाही.जे-३५ ए शेनयांग स्टेल्थ दोन इंजिनच फायटर जेट आहे. हे सिंगल सीटर विमान आहे. जमीन आणि समुद्र दोन्ही ठिकाणी कारवाई करण्यासाठी हे फायटर जेट सक्षम आहे.जे-३५ ए ला जे-२० नंतर विकसित करण्यात आलं आहे. हे पाचव्या पिढीच स्टेलथ फायटर विमान आहे. J-35A ची डिझाइन यूएस लॉकहीड मार्टिनच्या एफ -३५ सारखी आहे.
चीनकडून पाकिस्तानला ४० फायटर विमाने मिळणार
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/12/china-pakistan-relation-1024x576.jpg)