आता जौनपूरच्या शाहीपुला खालीकाली मंदिर असल्याचा दावा

जौनपूर -संभल, वाराणसी या ठिकाणी मशीदीखाली मंदिर असल्याच्या दाव्यानंतर आता जौनपूर येथील शाही पूलाच्या खाली कालिका मातेचे मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे मंदिर भिंत बांधून बंद करण्यात आले असल्याचे सांगत ही भिंत पाडण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.जौनपूर येथील हा शाही पूल अकबरी पूलाच्या नावानेही ओळखला जातो. तो सम्राट अकबराने १५६८ मध्ये हा पूल बांधला होता. अफगाणी वास्तुविशारद अफझल अली याने त्याची रचना केली असून जौनपूरमधील हा महत्त्वाचा पूल समजला जातो. हा ऐतिहासिक पूल आजही वापरात असून त्यावर उभारण्यात आलेल्या २८ छत्र्यांमध्ये सध्या दुकाने थाटण्यात आली आहेत. हिंदू संघटनांनी हनुमान घाटाजवळच्या पुलाच्या एका खांबाच्या खाली १२ व्या शतकापासून काली मातेचे मंदिर असल्याचा दावा केला आहे. मात्र, जिल्हाधिकारी इंद्रनंदन सिंह यांनी या संदर्भात आपल्याकडे कोणतीही मागणी केली नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, कोणी सांगितले म्हणून या पूलाची भिंत पाडता येणार नाही. या पूलाची देखभाल सध्या पुरातत्त्व विभागाकडे असल्याने तेच या बाबतीत निर्णय घेऊ शकतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top