धुळे – शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील चारणपाडा जवळ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला. गतिरोधकवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. पुढे असलेल्या कंटेनरला पाठीमागून या ट्रकने धडक दिली.या धडकेनंतर कंटेनर रस्त्यावर उलटला. या अपघातात ट्रक चालक आणि सहचालक या दोघांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी व पोलिसांनी मदतकार्य केले. क्रेनच्या साहाय्याने उलटलेला कंटेनर रस्त्यावरून बाजूला करत वाहतूक मोकळी केली. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत करत आहे