वॉशिंग्टन – पृथ्वीच्या जवळून एक लघुग्रह जाणार आहे. या लघुग्रहाला ‘२०२४ एक्सएन १ ‘ असे नाव देण्यात आले आहे. ख्रिसमसच्या आधी एक दिवस म्हणजेच मंगळवारी २४ डिसेंबरला हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाईल.या लघुग्रहाची लांबी १२० फूट असून, तो पृथ्वीपासून ७२,०९,८६१ किलोमीटर अंतरावरून जाईल. हे अंतर चंद्र आणि पृथ्वीदरम्यानच्या अंतराच्या सोळापट अधिक आहे.
हा लघुग्रह ताशी २३,७२६ किलोमीटर वेगाने येत आहे. त्याच्यापासून पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. अशा लघुग्रहांच्या अभ्यासातून सुरुवातीच्या काळातील सौरमंडळाबाबत समजून घेण्यास मदत मिळते. ‘नासा’ या लघुग्रहावर ट्रॅकिंग तंत्राने नजर ठेवून आहे, जेणेकरून त्याच्या मार्गाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. या लघुग्रहापासून कोणताही धोका नसला, तरी आपल्या ग्रहाच्या सुरक्षेसाठी अशी खबरदारी घेणे क्रमप्राप्त ठरते.’२०२४ एक्सएन १’ पृथ्वीजवळून जाणार्या आगामी पाच लघुग्रहांपैकी सर्वात मोठ्या आकाराचा आहे. ‘नासा’च्या ‘अॅस्टेरॉईड वॉच’ डॅशबोर्डद्वारे त्याला ट्रॅक केले जात आहे.हा डॅशबोर्ड पृथ्वीजवळून जाणारे अॅस्टेरॉईड आणि धूमकेतूंची माहिती देतो. त्याच्या माध्यमातून अशा खगोलांचा आकार आणि वेग याची माहिती मिळते.