मुंबई – प्लास्टिकचे प्रदूषण कमी व्हावे म्हणून महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. यासाठी आतापर्यंत अशा प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणार्यावर कारवाई केली जात होती. मात्र आता प्लास्टिक पिशवी हातात दिसली तरी संबंधित ग्राहकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
नवीन वर्षापासून ही कायमस्वरूपी प्लास्टिक बंदी मोहीम कठोरपणे राबविली जाणार आहे. यामध्ये बाजारात खरेदीसाठी जाताना जरी एखाद्याच्या हातात अशी प्लास्टिक पिशवी दिसल्यास त्या ग्राहकावर कारवाई करत ५०० रुपये दंड वसूल केला जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.