सुनिता विल्यम्स यांचा अंतराळातून परतीचा प्रवास आणखी लांबणीवर

वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांची पृथ्विवर परतण्याची तारीख आणखी लांबणीवर पडली आहे. सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर यांना पुढील वर्षी मार्चमध्ये पृथ्विवर परत आणण्यात येईल असे नासाने काल सांगितले . मात्र नेमकी तारीख नासाने जाहीर केली नाही. सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे अंतराळवीर यावर्षीच्या जून महिन्यात अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थळावर गेले होते. मात्र त्यांना तिथपर्यंत पोहोचविल्यानंतर अवकाश यानात बिघाड झाल्याने ते अवकाश स्थानकावर अडकून पडले आहेत. त्यांना पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात हे अंतराळवीर पृथ्विवर परत आणतील असे नासाने यापूर्वी जाहीर केले होते. आता नासाने त्यांना परत आणण्याची मोहीम मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.