शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५०२ अंकांनी घसरून ८०,१८१ अंकावर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १३७ अंकांनी घसरून २४,१९८ अंकांवर बंद झाला.तर बँक निफ्टीत ६९५ अंकांनी घसरून ५२,१३९ अंकांवर बंद झाला.
आजच्या घसरणीमुळे शेअर बाजार आता तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये आज विक्रीचा जोर राहिला.बँक निफ्टी १.५ टक्क्याच्या घसरणीसह बंद झाला. फार्मा आणि आयटी क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज घसरले.
या आठवड्यातील बाजारातील घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ६.६५ लाख कोटींनी घसरले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top