बार्शी- बार्शी ते येरमाळा रस्त्यावर पाथरी गावाजवळील वीज केंद्राजवळ भीषण अपघात झाला. कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.काल मंगळवारी दुपारी हा अपघात घडला.
अपघातातील मृतांची नावे- महामुनी काळे,रा. वालवड, ता.भूम आणि सारिका नितीन चव्हाण (३), रा. गुंदेगाव,ता.नगर अशी आहेत. तर रवी चंद्रवंशी (रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे जखमीचे नाव आहे.जखमीवर बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच पाथरी गावातील ग्रामस्थ, चंद्रकांत चौधरी, पोलीस पाटील शंकर गायकवाड, नरसिंग गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी महत्त्वाची मदत केली. त्यामुळे रवी चंद्रवंशी यांचे प्राण वाचवणे शक्य झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे आणि राहुल बोंदर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला. संबंधित कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.