आग्रा- आग्रा येथील वादग्रस्त बिल्डर प्रखर गर्ग यांच्या घरावर लखनौच्या ईडीच्या पथकाने छापा टाकला.प्रखर गर्ग यांनी वृंदावन कॉरिडॉरच्या बांधकामासाठी बांके बिहारी भाविकांकडून ५१० कोटी रुपये जमा केल्याचे सांगितले होते.तेव्हा ते चांगलेच चर्चेत आले.
आग्र्यातील द्वारिकापुरम येथील प्रखर गर्ग यांच्या घरावर ईडीच्या पथकाने आज पहाटे छापा टाकला. त्यानंतर या पथकाने घरातून ये-जा थांबली आणि त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.यासोबतच त्यांच्या नोएडासह इतर ठिकाणीही ईडीने छापेमारी केली.या कारवाईत ईडीने कागदपत्र जप्त केले.त्यासोबत प्रखर गर्ग यांची चौकशीही केली.प्रखर गर्ग वादग्रस्त व्यक्ती असून फसवणूक,खंडणी आणि चेक बाऊन्स प्रकरणी त्यांच्यावर अनेक खटले सुरु आहेत.ते सध्या जामीनावर बाहेर आहे.