दोन सख्ख्या भावांचा विहिरीत पडून मृत्यू

पुणे – पैठण तालुक्यातील आडुळ येथे आज दुपारी २ शाळकरी सख्ख्या भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. जय कृष्णा फणसे (१०) व प्रणव कृष्णा फणसे (६) अशी मृत मुलांची नावे आहेत.
आडुळ येथील चौथीमध्ये शिकत असलेला जय फणसे आणि पहिलीमध्ये शिकत असलेला प्रणव फणसे हे २ सख्खे भाऊ आपल्या आईसोबत जमवाडी परिसरातील रजापूर शिवारातील विहिरीवर गेले होते. यावेळी कठडे नसलेल्या विहिरीमध्ये दोघे पडून त्यांचा मृत्यू झाला.
पाचोड पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने एका मुलाचा मृतदेह बाहेर काढला. मात्र दुसऱ्याचा मृतदेह सापडला नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर जवानाच्या मदतीने तीन वाजताच्या दरम्यान त्याचाही मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top