चिकमंगलूरु- अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी काल श्री जगदगुरु रेणुकाचार्य मंदिरातील श्रीमद रंभापुरी वीररुद्रमणी जगदगुरु यांच्या शताब्दी महोत्सवासाठी एक यांत्रिक हत्ती दान दिला आहे.
या यांत्रिक हत्तीचे नाव वीरभद्र असून हा हत्ती तीन मीटर उंचीचा आहे. त्याचे वजन ८०० किलो असून तो रबर, फायबर, धातु, जाळ्या, फोम आणि स्टिलपासून तयार करण्यात आला असून तो चालवण्यासाठी पाच मोटर वापरण्यात येतात. कर्नाटकचे वने व पर्यावरण मंत्री इश्वर बी खांद्रे यांनी प्राणी प्रेमी संघटना पेटा व कुपा यांच्यासह अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे मंदिरांमध्ये आता खरे हत्ती ठेवण्याची गरज राहिली नाही. रामभापुरी पीठाच्या रेणुकाचार्य मंदिराने याआधीच खरे हत्ती ठेवणे किंवा भाड्याने घेण्याची प्रथा बंद केली आहे. आता रोबोटिक हत्ती आल्याने मंदिरातील धार्मिक परंपराही जपल्या जातील व खऱ्या हत्तींना आपल्या नैसर्गिक अधिवासाचा आनंद घेता येईल.