अहमदाबाद – गुजरातमधून एका ३२ वर्षीय तरुणाने कुटुंबियांच्या कंपनीत काम करावे लागू नये म्हणून स्वतःच्या डाव्या हाताची चार बोटे छाटून टाकली.
मयूर तरापरा असे या तरुणाचे नाव आहे. त्याने पोलिसांसमोर असा बनाव केला की आपण बेशुद्ध होऊन रस्तावर कोसळलो. शुद्धिवर आलो तेव्हा माझ्या हाताची चार बोटे गायब झाली होती. त्याच्या या सांगण्यावर पोलिसांचा विश्वास बसेना. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने स्वतःच आपली बोटे छाटून घेतल्याचे स्पष्ट झाले.
सुरतमध्ये मयूरच्या कुटुंबाच्या मालकीची अनभ जेम्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत मयूर कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. मात्र त्याला ते काम करण्याची इच्छा नव्हती. पण तसे थेट आपल्या कुटुंबियांना सांगण्याची हिंमत त्याला होत नव्हती. त्यामुळे त्याने हा आत्मघातकी निर्णय घेतला,असे सुरत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.