धुळे – धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांनी त्यांचे अकाउंटंट नीलेश अग्रवाल विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. बनावट सह्या व नोंदी करून ५१ लाख ५० हजारांची रक्कम नीलेश अग्रवालने परस्पर खात्यात काढून घेत गैरव्यवहार केला असा आरोप या तक्रारीत केला आहे.
तक्रारीनुसार, नरेशकुमार अँण्ड कंपनी आणि गणेश एंटरप्रायजेस या भागीदारीमध्ये असलेल्या फर्म आहे. त्यांचे गरुड बाग येथील धुळे विकास सहकारी बँकेत करंटं खाते आहे. अग्रवाल कुटुंबीयांनी नीलेश कचरूलाल अग्रवाल यांच्याकडे अकाउंटंट म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्याचा गैरफायदा घेत नीलेश अग्रवाल यांनी बँक खात्याच्या चेकबुकचा दुरुपयोग केला. नीलेश अग्रवाल यांनी लुटलेल्या पैशातून कुटुंबीय व नातलगांच्या नावे मालमत्ता घेतली. त्यातून ओमप्रकाश अग्रवाल यांच्यासह फर्ममधील इतर भागीदारांची फसवणूक झाली.