एनआयएकडून संशयिताची सलग तीन दिवस चौकशी

अमरावती – एनआयएने तीन दिवसांपूर्वी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्‍मद संबंधित पाच राज्‍यांमध्‍ये कारवाई केली. महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, आसाम, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील संशयितांच्या संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएच्या टीमने छापेमारी केली. यात मोहंमद मुसैब ईसा या ३५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याची एनआयने सलग तीन दिवस चौकशी केली.

गुरुवारी १५ तासांच्या चौकशीनंतर त्याला ‎सायंकाळी सोडण्यात आले. ‎‎शुक्रवारी सकाळी पुन्हा साडेनऊ ‎‎वाजतापासून चौकशी करून ‎रात्री साडेनऊ वाजता त्याला सोडले. आज सकाळी त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले. राजापेठ पोलीस ठाण्यात या तरुणाची चौकशी करण्यात आली . या तरुणाचा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा एनआयएला संशय आहे. त्यामुळे त्याची कसून चौकशी सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top