नवी दिल्ली – नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ११ ते १४ डिसेंबरपर्यंत अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये ते सहभागी होतील. द्विपक्षीय लष्करी सहकार्य वाढवणे आणि संरक्षण सहकार्यासाठी नवीन मार्ग शोधणे हा या भेटीचा उद्देश आहे.
१२ डिसेंबर रोजी जनरल सिग्देल राष्ट्रपती भवनात समारंभाला उपस्थित राहणार आहेत. भारतीय लष्कर आणि नेपाळी लष्कर यांच्यातील अनोख्या परंपरेनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सिग्देल यांना भारतीय लष्कराच्या मानद जनरल पदाने सन्मानित करतील. १३ डिसेंबर रोजी ते पुण्यातील भारतीय संरक्षण उद्योगाला भेट , १४ डिसेंबर रोजी जंटलमन कॅडेट्सच्या परेडमध्ये पुनरावलोकन अधिकारी म्हणून सलामी, नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांशी संवाद, १४ डिसेंबरला अयोध्येला दौरा आणि राम मंदिरात पूजा असा त्यांचा कार्यक्रम राहील.