नवी दिल्ली- देशातील लघु आणि अल्प भू धारक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जांमध्ये गेल्या तीन वर्षांत वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
यावेळी निर्मला सितारामन म्हणाल्या की, २०२१-२२ या आर्थिक वर्षात लघु आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना ११ कोटी ६७ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण झाले तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात तेरा कोटींहून अधिक रुपयांची कृषीकर्जे मंजूर करण्यात आली.
देशातील आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या १८ वर्षांत १ हजार २९ प्रकल्प मंजूर झाले आहे. आदिवासी विकास निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या या निधीचा आतापर्यंत ६ लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ मिळाला आहे.