मुंबई- जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून त्यांनी आंदोलन केले. यावेळी ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी शिवनेरीवर पहिला सुवर्ण कलश आणला होता. पहिली कॅबिनेटची बैठकदेखील शिवनेरीवर झाली होती. पण शिवनेरीला मंत्रिमंडळात स्थान नाही. शिवनेरीच्या भूमिला मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी सरकारला माझी विनंती आहे. दरम्यान, महायुती सरकार न्याय देईल असा विश्वासदेखील शरद सोनावणे यांनी व्यक्त केला आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |