मुंबई – आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदारांचा शपथविधी होत असताना भाजपाचे राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.
दुपारी बारापर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत देण्यात आली होती . तोपर्यंत नार्वेकर यांच्या शिवाय इतर कोणत्याही पक्षाने अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर पुन्हा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बिनविरोध होतील. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या केली जाईल.
राहुल नार्वेकर यांना मंत्रीपदाची आशा होती . मात्र त्यांनी आता अर्ज भरला याचा अर्थ मंत्रीपदाबाबत त्यांचा विचार झाला नाही.