रत्नागिरी – नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे सज्ज झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अहमदाबाद ते थिविम आणि थिविम ते अहमदाबाद दरम्यान कोकण रेल्वे विशेष गाडी सोडणार आहे. ही विशेष गाडी आठवड्यातून दोनदा धावणार आहे.
थिविम-अहमदाबाद ही गाडी ९ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी चालवली जाणार असून ही गाडी सकाळी ११.४० वाजता थिविम स्थानकातून सुटेल. या विशेष गाडीला आणंद, वडोदरा, भरुच, उधना जंक्शन, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्टेशनवर थांबेल. ही गाडी प्रत्येक रविवार आणि बुधवारी दुपारी २.१० मिनिटांनी अहमदाबाद स्थानकातून सुटेल, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.