मुंबई – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यांनी आज तिमाही पतधोरण जाहीर करताच त्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट न वाढवता तो ६.५ टक्के कायम राखल्याने बाजारात घसरण दिसून आली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवस अखेरीस ५६.७४ अंकांनी घसरून ८१,७०९.१२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३०.६० अंकांच्या घसरणीसह २४,६७७.८० अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारांत मुंबई शेअर बाजारात सुचीबद्ध असलेल्या ३० कंपन्यांपैकी १७ कंपन्यांचे शेअर घसरले. तर १३ कंपन्या नफ्यात होत्या.