न्यूयॉर्क – अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील पाकिस्तानच्या मालकीचे रुझवेल्ट हॉटेल तीन वर्षांसाठी घुसखोरांना भोडेतत्वावर देण्याच्या न्यूयॉर्क शहर प्रशासनाच्या प्रस्तावावर सध्या मोठा वाद सुरू आहे. हे हॉटेल २०२० पासून बंद आहे. ते तीन वर्षांसाठी २२० दशलक्ष अमेरिकन डॉलरला घुसखोरी करणाऱ्यांना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पार्टीचे नेते भारतीय वंशाचे विवेक रामस्वामी यांनी विरोध केला आहे.
रामस्वामी हे राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेतील एक उमेदवार होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानला मदतीचे पॅकेज देऊ केले आहे. या पॅकेजचा एक भाग म्हणून पाकिस्तानच्या मालकीच रुझवेल्ट हॉटेल तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव आहे. २२० दशलक्ष डॉलरचा हा निधी पाकिस्तानला देण्यात येणार आहे.
रामस्वामी यांनी याला विरोध केला आहे. हा अमेरिकन करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे,असा रामस्वामी यांचा आरोप आहे.