मुंबई- भारताची परकीय गंगाजळी गंगाजळी २२ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.३१ अब्ज अमेरिकन डॉलरने घसरून ६५६.५८२ अब्ज डॉलरवर आली, अशी माहिती आरअबीआयने काल दिली.
सप्टेंबरच्या अखेरीस ७०४.८८५ अब्ज अमेरिकन डॉलरचा सार्वकालिक उच्चांक गाठणारी गंगाजळी गेले काही आठवड्यांपासून घसरत आहे. २२ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय गंगाजळीचा एक प्रमुख घटक असलेली विदेशी चलन मालमत्ता ३.०४३ अब्ज डॉलरने घटून ५६६.७९१ अब्ज डॉलर झाली. दरम्यान, या आठवडाभरात देशातील सोन्याचा साठा १.८२८ अब्ज डॉलरने वाढून ६७.५७३ अब्ज डॉलर झाला. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील भारताचा साठाही ४२ दशलक्ष डॉलरने घसरून ५.१७४ अब्ज डॉलर इतका राहिला., असे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीत दिसून आले आहे.