चंद्रपूर – झाडे तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. रेखाबाई मारोती येरमलवार असे महिलेचे नाव आहे. निलंसनी पेठगाव येथील रहिवासी रेखाबाई काल निलंसनी पेठगावला लागून असलेल्या वैनगंगा नदीकाठावरील जंगलात गेल्या होत्या. नदीलगतच्या नाल्याजवळ झाडे कापत असताना दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्या सायंकाळी घरी परत आल्या नाहीत. त्यामुळे मुलगा महादेव येरमलवार, राकेश येरमलवार व गावकऱ्यांनी रात्री तिचा शोध घेतला, परंतु या महिलेचा शोध लागला नाही. आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.