छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटका आल्याने ३५ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. इम्रान पटेल असे या मृत खेळाडूचे नाव आहे.
इम्रान सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला होता. फलंदाजी करताना त्याने दोन चौकार लगावले. पण काही वेळ फलंदाजी केल्यानंतर त्याच्या छातीत आणि हातामध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्याने पंचांना याची माहिती दिली. यानंतर पंचांनी त्याला मैदान सोडण्याची परवानगी दिली. त्यानंतर इम्रान पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला होता असताना अचानक कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी इम्रानच्या तिसऱ्या मुलीचा जन्म झाला. इम्रान पटेलचा सहकारी नसीर खानने सांगितले की, सामन्यापूर्वी त्याला असा काही त्रास जाणवला नव्हता. इमरानला कोणताही इतर आजार किंवा काही त्रास नव्हता. तो फिट होता. तो एक अष्टपैलू खेळाडू होता. ज्याला क्रिकेटची खूप आवड होती.