हेमंत सोरेन चौथ्‍यांदा मुख्यमंत्री! शपथविधीला १० पक्षांचे नेते

रांची – झारखंड मुक्‍ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज दुपारी झारखंडच्‍या मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्‍यपाल संतोष कुमार गंगवार यांनी रांचीमधील मारोबाडी मैदानावर राज्‍याचे १४ वे मुख्‍यमंत्री म्‍हणून हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांचा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हा चौथा कार्यकाळ असेल. झारखंडच्या इतिहासात चौथ्‍यांदा मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते पहिले ठरले आहेत.
या सोहळ्यासाठी झारखंड मुक्‍ती मोर्चाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शिबू सोरेन, त्‍यांची पत्‍नी रुपी सोरेन, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, खासदार शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्‍ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, काँग्रेस नेते तारिक अन्वर, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, आप नेते अरविंद केजरीवाल,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी इंडिया आघाडीतील १० पक्षांचे नेते उपस्‍थित होते. नुकत्‍याच झालेल्‍या झारखंड विधानसभा निवडणुकीत सोरेन यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील झारखंड मुक्‍ती मोर्चाच्या नेतृत्त्वाखालील आघाडीला ८१ पैकी ५६ जागा मिळाल्‍या. तर भाजपप्रणित ‘एनडीए’ आघाडीला फक्त २४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top