नवी दिल्ली – देशात चालत असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांपैकी बहुतांश गांड्यांना अपुऱ्या प्रवासी संख्येमुळे फटका बसत आहे. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत रेल्वे गाडीबाबत अशीच परिस्थिती आहे.या गाडीला पुरेसे प्रवासीच मिळत नाहीत. क्षमतेच्या २५ ट्क्के प्रवासी संख्या असल्याने या रेल्वेचे डबे २० वरून ८ वर आणण्याचा नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली आहे.
नागपूर-सिकंदराबाद २० डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस या वर्षी १९ सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली. मात्र सुरुवातीपासूनच या गाडीला पूर्ण क्षमतेएवढे प्रवासी मिळत नाहीत. दिवाळीच्या सुट्टीतील आठ दिवस वगळता या गाडीला कधीही पूर्ण संख्येने प्रवासी मिळालेले नाहीत.त्यामुळे या गाडीचे १२ डबे पर्यंत कमी करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने केला आहे.